"मी म्हणजे ना शरीर | मी मद ग्रंथांचा संभार ||"

आमच्या बद्दल

मराठवाडयातील एक संत व थोर कीर्तनकार म्हणून  संतकवी श्री दासगणू महाराज अध्यात्माच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. शिर्डीच्या श्री साईबाबांच्या आज्ञेने त्यांनी संतचरित्रे लिहिली. त्यांनी दीड लाख काव्य-वाड्मय लिहून मराठी भाषेला समृद्ध केलेच पण त्यांच्या लेखनात समन्वविशेष दिसून येतो. भक्तिमार्गाचा प्रचार, संन्नीती -सदाचाराची शिकवण देऊन समाज जागृती करणे  हे  त्यांचे  जीवनसूत्र  होते. त्यांचे कार्य मराठी सारस्वताला एक देणगीच आहे. ते पंढरपुरी कार्तिक व. १३ शके  १९११ (२६  नोव्हेंबर १९६२) या दिवशी वैकुंठवासी झाले.

संतविद्या प्रबोधिनी

समाज – मानसात पारमार्थिक दृष्ट्या समानतेची गुढी उभारून सर्व समाज जागृत होईल अशी आचारपद्धती संतांनी अवलंबिली. तरीही काही विद्वान मंडळी संतवाड्मयावरही आक्षेप घेतात, कुतर्क लढवितात. हे सारे टाळण्यासाठी प्रतिष्ठानने एक पाऊल पुढे टाकले आणि श्री राधादामोदार प्रतिष्ठानची आणखी एक शाखा निर्माण केली. तिचे नाव “संतविद्या प्रबोधिनी”. या प्रबोधिनीचे उद्देशही तसेच आहेत.

१) संत वाड्मयाचा सखोल अभ्यास करणे
२) आक्षेपांचे निराकरण करणे
३) संस्कार वर्ग चालवणे
४) संतांच्या ग्रंथांची पारायणे घडविणे
५) भारत – भागवतादी ग्रंथांच्या आधारे परंपरांचे रक्षण करणे
६) समाजजागृतीसाठी आणि राष्ट्रविचाराच्या जागृतीसाठी विविध विषयांवर परिसंवाद घेणे इत्यादी.

संपर्क साधा

पूज्य स्वामीजींच्या कृपाछत्राखाली आणि जनताजनार्दनाच्या आशीर्वाद बळावर संस्कृतीचे कार्य असेच वृद्धिंगत होत राहील. श्री. राधादामोदर प्रतिष्ठानास आपली मौल्यवान मते, सल्ले कळवण्यासाठी वेबसाईट मार्फत संपर्क साधा.